धुळे : औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या बलात्कार प्रकरणी धुळ्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासह भारतीय जनता युवा मार्चाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. संशयित नेत्याला शिक्षा देण्याची मागणी भाजयुमोने केली आहे तर पक्षाच्या नेत्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसने केली आहे.भारतीय जनता युवा मार्चाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद येथील २९ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून बलात्कार करणारे राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब इब्राहीम शेख रा. शिरुर कासारा जि. बिड यांना कठोर शासन करावे अशी मागणी भाजयुमो जिल्हाध्यक्ष कुणाल चाैधरी, सागर कोडगीर, सुमित माईनकर, अमृता पाटील, सोनल मराठे, जयेश वावदे, मकरंद अंपळकर, दिपक कोळी, हर्षल बोरसे, विष्णू जावडेकर, सचिन पाटील, सचिन कायस`थ, विक्की सोनार, अर्जुन महाले, विजय शेलार, राेहित चांदोडे, सागर पगारे, नितीन मराठे, राहुल धात्रक, अक्षय जाधव, विजय सोनवणे आदींनी केली आहे.राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस काॅंग्रेसने हा खोटा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. पक्षाला आणि चांगल्या पदाधिकारीला बदनाम करण्याचे कटकारस`थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष मयुर बाेरसे, युवक शहराध्यक्ष कुणाल पवार, सुनील पाटील, वाल्मिक मराठे, एजाज शेख, मिर`झा अशफाक, निखिल पाटील, महेश भामरे, अनिकेत माईनकर, निखिल वाघ, राजेंद्र चाैधरी, मनोज कोळेकर, कार्तीक मराठे, निलेश चाैधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे.
औरंगाबाद बलात्कार प्रकरणात सत्ताधारी-विरोधी पक्षाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 19:39 IST