पिकांचा ढिगारा दाखवत सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:14 IST2019-11-05T23:14:26+5:302019-11-05T23:14:26+5:30
जिल्हा प्रशासनाला निवेदन : जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे धरणे आंदोलन

पिकांचा ढिगारा दाखवत सरकारचा निषेध
धुळे : अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस, मका, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानीच्या पिकांचा ढिगारा निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दाखवत सरकारचा निषेध करण्यात आला़
शहरातील क्यूमाईन क्लबजवळ सकाळी १० वाजता आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना शंभर टक्के भरपाई, सरसकट कर्जमाफी, वाढती महागाई, बेरोजगारी अशा संकटातून सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी आंदोलनात आमदार सुधिर तांबे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. एकीकडे शेतकरी संकटात असतांना सत्ता आणि खुर्ची मिळविण्यासाठी भाजपा सरकार मस्तीत तर दुसरीकडे कृषीप्रधान देशात आणि पुरोगामी महाराष्ट्रात शेकºयांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरावे लागत आहे़ ही महाराष्ट्राच्या दृष्टीने काळीमा फासणारी घटना आहे. शेतकºयांचा आवाज बुलंद करण्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची काँग्रेसची तयार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरु लागला आहे. त्यामुळे शेतकºयांना आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. भविष्यात सरकार कोणाचेही येऊ द्या शेतकºयांसाठी चालणारा आपला लढा तीव्र केला जाईल असा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी दिला़
यावेळी बाजार समितीची माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, रमेश श्रीखंडे, बाजीराव पाटील, भानुदास माळी, रणजित पावरा, रितेश पाटील, पंढरीनाथ पाटील, रावसाहेब पवार, भानुदास गांगुर्डे, प्रमोद सिसोदे, बापू खैरनार, प्रमोद भदाणे, छोटू चौधरी, शरद माळी, अरुण पाटील, राजीव पाटील, रावसाहेब पाटील, दिनेश बोरसे, अलोक रघुवंशी, बापू नेरकर, नंदु खैरनार साक्री, धिरण अहिरे, किशोर पाटील, प्रकाश पाटील, दिपक देसले,विमलाताई बेडसे, नाजनीन शेख उपस्थित होते.