लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चीनचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन त्यात चिनी वस्तू ठेवत त्याचे दोंडाईचा येथे दहन करण्यात आले़ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखांसह दोंडाईचा येथील शिवसैनिकांनी शुक्रवारी निषेध व्यक्त केला़दोंडाईचा येथील महादेवपुरा भागातील भगवा चौक येथे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, काँग्रेस पक्षाचे वासुदेव चित्तेंसह शिवसैनिकांनी गलवान घाटी येथे चीन देशाच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला केला़ यात शहीद झालेल्या २० जवानांना मानवंदना देवुन चीन देशाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून चिनी वस्तूंचा बहिष्कार करत घोषणा देत त्याचे दहन करण्यात आले़चिनी सरकारने भारतातील लोकांना हिंदी चीनी भाई भाई म्हणत आधीच खुप मोठा भाग गिळंकृत करुन ठेवलेला आहे. गलवान घाटीत भारत आपल्या स्वत:च्या भागात रस्ता बांधत असतांना चीनचे सैनिक त्यात बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करु लागले़ त्यावेळी आपले आणि चीनचे सैन्य समोरासमोर आले़ त्यातुन भारताचे २० सैनिक शहीद झाले तर चिनला सडेतोड उत्तर देत त्यांचे पण ४५ वर सैनिक यमसदनी पाठविले़ अश्या विकृत चीनच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या डोक्यात काठ्या घालुन पुतळा दहन करण्यात आला़यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, काँग्रेस पक्षाचे वासुदेव चित्ते, राजधर कोळी, हर्षल ठाकूर, संजय मगरे, लालतु भाऊसह शिवसैनिक व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते़शिंदखेड्यातही आंदोलनशिवसेना पक्षाचा वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिवसेनेचे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वात शिंदखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, वरपाडे रोड येथे आंदोलन झाले. यावेळी मंगेश पवार, शानाभाऊ सोनवणे, विश्वनाथ पाटील, शिरपूरचे भरतसिंह राजपूत, छोटू पाटील, सजेर्राव पाटील, भाईदास पाटील, डॉ. मनोज पाटील, अशोक मराठे, नंदकिशोर पाटील, मनोज धनगर, सद्दाम तेली, संतोष देसले, हिरालाल बोरसे, सागर देसले, गिरीश पाटील, चेतन राजपुत, संतोष माळी, विनायक पवार, गणेश परदेशी, शैलेश सोनार, दिपक बोरसे, प्रदीप पवार, दिपक जगताप, सुकदेव बागुलसह शिवसैनिक उपस्थित होते.
चीनच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा निषेध अन् दहनही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:04 IST