सहाय्यक आयुक्तांवर भ्याड हल्ल्याचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:16+5:302021-09-02T05:17:16+5:30
यावेळी महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन काळी फिती लावून निषेधात्मक आंदोलन करून गुन्हेगारी कृत्याचा ...

सहाय्यक आयुक्तांवर भ्याड हल्ल्याचा केला निषेध
यावेळी महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन काळी फिती लावून निषेधात्मक आंदोलन करून गुन्हेगारी कृत्याचा निषेध केला यावेळी दोन तास लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले हातेे.
निवेदनात म्हटले आहे की, ठाणे महापालिकेतील माजीवाडा मानपाडा प्रभागात सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंगळे या अतिक्रमण विरोधी पथक घेऊन कारवाईसाठी गेल्या असतांना तेथील अमरजित यादव याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पिंगळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांच्या संरक्षणासाठी पुढे आलेल्या अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्या ही आताचे बोटे तुटले आहे. हा हल्ला म्हणजे प्रशासनाचे मनोधर्य खच्चीकरण करणारा असून या संघटीत गुन्हेगारीचा मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जाहीर निषेध करण्यात आला.
आंदोलनात अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस उपायुक्त गणेश गिरी, शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, विनायक कोते, पल्लवी शिरसाट तसेच अभियंता कैलाश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, नगर सचिव मनोज वाघ, बळवंत रणाळकर, किशोर सुडके, रमजान अन्सारी, प्रसाद जाधव, कामगार नेते सुनील देवरे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.