शिरपूरला निषेधात्मक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:38 AM2021-05-06T04:38:31+5:302021-05-06T04:38:31+5:30

५ रोजी शहरातील कोर्टासमोरील भाजपचे प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ...

Protest movement in Shirpur | शिरपूरला निषेधात्मक आंदोलन

शिरपूरला निषेधात्मक आंदोलन

googlenewsNext

५ रोजी शहरातील कोर्टासमोरील भाजपचे प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा शिरपूर भाजपतर्फे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. भाजप प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा संपर्क कार्यालयाचा बाहेर हातात पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधाच्या घोषवाक्य असलेले फलक, भाजपचे झेंडे व डोक्याला काळ्या फिती बांधून, तसेच सोशल डिस्टन्स ठेवून निषेध आंदोलन करण्यात आले.

Web Title: Protest movement in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.