धुळे शहरातील प्रस्तावित रस्ते कामासाठी उद्यान जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:23 IST2018-02-09T21:22:43+5:302018-02-09T21:23:31+5:30
अतिक्रमण काढण्यावरून स्वामी समर्थ मंदिर परिसरात गोंधळ : सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा, पोलीस प्रशासनातर्फे कारवाई

धुळे शहरातील प्रस्तावित रस्ते कामासाठी उद्यान जमीनदोस्त
ठळक मुद्देसभामंडपासह स्थानिकांची घरे, टपºया, पूजेची दुकाने केली जमीनदोस्त स्वामी समर्थ मंदिर परिसरातील बिस्मिल्ला गादी भांडारचे संचालक सलीम भाई यांना दोन तासात दुकानातील वस्तू काढून घ्या, असे मनपाच्या पथकाने सूचित केले होते. परंतु, मुदत देऊनही दुपारी तीन वाजेपर्यंत संबंधित दुकानदाराने दुकानातील वस्तू न काढल्याने जेसीबीच्या साहाय्याने त्यांचे गादी भांडारचे दुकान पाडण्यात आले.पुढे स्वामी समर्थ मंदिरासमोरील सभामंडपही काढण्यात आला.त्याशिवाय एक चहाची टपरी, प्रथमेश सर्व्हिस सेंटरचे शेड, मंगलसिंग भोई, धनसिंग जमादार, यांची घरे, योगेश अहिरे, मंगल भुजबळ, कन्हैया जाधव यांच्या दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. हे अतिक्रमण काढत असताना कर्मचारी व अतिक्रमणधारकांमध्ये दुपारी बराच काळ वाद झाल्या
त्या वेळी अतिक्रमण पथकाचे कर्मचारी व स्थानिक अतिक्रमणधारकांमध्ये तू-तू-मैं-मैं झाल्याने या परिसरात काही काळ गोंधळ व तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु, पोलीस बंदोबस्त असल्याने मनपाच्या पथकाने येथील परिसरातील अतिक्रमण उद्ध्वस्त केले. या वेळी मनपाचे शहर अभियंता कैलास शिंदे, नगररचनाकार पी. डी. चव्हाण, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे सुनंद भामरे, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील उपस्थित होते.