कॉलन्यांमधील खुल्या जागेवर सार्वजनिक शौचालयाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:53 IST2019-11-18T11:53:07+5:302019-11-18T11:53:46+5:30
नागरिक संतप्त : साक्री नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत दर्शवला विरोध

dhule
साक्री : शहरातील माधव नगर, बंजारा तांडा, प्रभाकर नगर, विकास कॉलनी या कॉलन्यांच्या परिसरातील रहिवाशांची संमती न घेता तसेच कोणतीही माहिती न देता माधव नगरातील (गट क्र.१८) मोकळ्या जागेवर सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचा नगरपंचायतीचा प्रस्ताव आहे. मात्र त्यामुळे तेथील नागरिक संतप्त झाले असून गरज नसताना तसेच बालकांच्या आरोग्याचा विचार न करता होणाºया बांधकामला ताबडतोब स्थगिती मिळावी, यासाठी साक्री नागर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन विरोधही दर्शविण्यात आला.
माधव नगरातील रहिवाशांसह लगतच्या कॉलन्यांमध्ये राहणाºया सर्व रहिवाशांकडेही मालकीच्या घरांमध्ये प्रत्येकाचे स्वत:चे शौचालय आहे. माधव नगरातील मोकळ्या जागेवर यापूर्वीच बालकांच्या अंगणवाडीसाठी मोठी इमारत उभी करण्यात आली. लहान बालकांसाठी शिक्षणाची ही सोय रहिवाशांच्या संमतीमुळे झालेली आहे. उर्वरित जागेवर बगीचा करण्याऐवजी शैक्षणिक परिसराजवळ सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याच्या चुकीच्या नियोजनामुळे येथे शिक्षण घेणाºया चिमुरड्यांवर, त्यांच्यासह नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतील, याचा कोणताही विचार नगरपंचायत प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत.
नगरपंचायतीचे अभियंता व बांधकाम ठेकेदारांनी येथे येऊन सरळ ‘लाईन आऊट’ टाकण्यास सुरुवात केल्यावर येथील दक्ष नागरिकांनी विचारणा केली. त्यावेळी नगरपंचायतीच्या अभियंत्यांकडून त्यांना याबाबत माहिती कळाली.
वास्तविक येथील बंजारा तांड्याच्या दक्षिणेस याआधीच नदीकिनारी सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम झालेले आहे. तेथे साफसफाई नियमित होत नसल्याने अनारोग्याची समस्या निर्माण झाली आहे. तोच दुसरे सार्वजनिक शौचालय याच परिसरात बांधण्याची गरज नसताना नागरपंचायतीला त्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून निवेदनातही त्याबाबत उहापोह करण्यात आला आहे.
यावेळी रोडू गिरधर पवार, प्रताप राजाराम राठोड , धर्मेश राठोड, रघुनाथ राठोड, उत्तम पवार, संत्राबाई राठोड, सुरतीबाई राठोड, भरत जाधव, जिवराज जाधव, मदन जाधव, सुभाष जाधव, संपत जाधव, बिरबल पवार, वंदना जाधव, अनिल राठोड, इंदल राठोड , शीतल राठोड, भटू पवार, शिवाजी राठोड, युवराज मराठे, मधुकर नांद्रे, जे.के. पाटील, हरदास पवार, प्रताप पवार आदींनी स्वाक्षºया केल्या आहेत. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाºयांनाही पाठविल्याची माहिती देण्यात आली.