म्हसदीचे शिक्षकेतर कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:48 IST2019-03-05T22:47:20+5:302019-03-05T22:48:03+5:30

५ मार्चपासून बेमुदत संप

 Proposal for non-teaching staff | म्हसदीचे शिक्षकेतर कर्मचारी संपावर

dhule

म्हसदी : येथील स्व.अण्णासाहेब आर.डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी दि ५ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या दि ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी२०१९ चे अश्वसित प्रगती योजना बंद करण्याचे शासन निर्णय रद्द करावे यासाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या निर्णयाने बेमुदत संप पुकारण्यात आला असून या संपाला शिक्षक संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. या संपात अरुण पवार, महेंद्र देसले, घनश्याम देवरे, प्रवीण मोरे, राजेंद्र देवरे, ऋषिकेश चित्तम, जितेंद्र देवरे, शरद विसपुते, रत्नाकर जाधव, संजय बहिरम, बापू मोहिते, रामदास शेवाळे सहभागी झाले आहेत.

Web Title:  Proposal for non-teaching staff

टॅग्स :Dhuleधुळे