धुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती दोन वर्षांपासून रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:44 IST2020-02-24T11:43:32+5:302020-02-24T11:44:01+5:30
पदोन्नतीचे आदेश न मिळाल्यास २५ पासून कामबंदचा इशारा

धुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती दोन वर्षांपासून रखडली
आॅनलाइन लोकमत
धुळे : येथील जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांपासून वर्ग ३ व वर्ग ४च्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडल्याने, कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत पदोन्नतीचे आदेश न मिळाल्यास २५ पासून सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करतील असा इशारा महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हा परिषदेत गेल्या सात महिन्यांपासून प्रशासक राज होते. प्रशासक राजचा कर्मचाºयांनाही फटका बसला आहे. जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांपासून वर्ग ३ व वर्ग ४च्या कर्मचाºयांना पदोन्नतीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झालेली आहे.
या पदोन्नतीत कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपीक,कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारीपदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील जवळपास १२ ते १५ कर्मचाºयांना पदोन्नतीच्या लाभापासून वंचीत राहिलेले आहे.
या पदोन्नतीसंदर्भात कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र कुठलीच अमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनेने आता जिल्हापरिषदेला शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत पदोन्नतीचे आदेश न मिळाल्यास जिल्हा परिषदेत काम करणारे सर्व कर्मचारी २५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आलेला आहे.
निवेदनावर जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच गटनेते वनराज पाटील, किशोर पगारे, देवेंद्र पाटील, रंजना साळुंखे, एकनाथ चव्हाण, अनिल बैसाणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.