शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:40+5:302021-01-21T04:32:40+5:30
एक शाम शहीदों के नाम व कोरोना योद्ध्यांचा सत्कार धुळे : शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदू - मुस्लिम एकता व ...

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कार्यक्रम
एक शाम शहीदों के नाम व कोरोना योद्ध्यांचा सत्कार
धुळे : शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदू - मुस्लिम एकता व राष्ट्रीय एकात्मता वर आधारित एक शाम शहीदों के नाम हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता जेलरोडवरील गरुड वाचनालयाच्या हाॅलमध्ये होणार आहे. कार्यक्रमात कोरोनाच्या काळात ज्या डाॅक्टर, समाजसेवक व आरोग्य रक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सूर मेलोडीचे संचालक सिंग आरीफ मुजावर, सुरेश चत्रे, अकबर शाह, आरीफ राठोड यांनी केले आहे.
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मकरसंक्रांत साजरी
धुळे : शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रभारी प्राचार्या डाॅ. शोभा चौधरी यांच्या हस्ते सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले. तसेच याप्रसंगी ऑनलाईन न्यू सिटी हास्कूलमधील पर्यवेक्षिका जया जोशी यांनी मकर संक्रांतीचे भौगोलिक व सांस्कृतिक महत्त्व या विषयावर प्रशिक्षणार्थी यांना व्याख्यान दिले. प्रा. डाॅ. आरती सपकाळे यांनी आभार मानले.