मिरवणूक व डीजेला परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:29+5:302021-09-07T04:43:29+5:30
मैराळे म्हणाले की, गणपती हे आराध्य दैवत आहे. मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आपली जबाबदारी वाढली ...

मिरवणूक व डीजेला परवानगी नाही
मैराळे म्हणाले की, गणपती हे आराध्य दैवत आहे. मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आपली जबाबदारी वाढली असून, सर्वच धार्मिक कार्यक्रम साधेपणाने साजरा होत असताना साहजिकच गणेशोत्सवावरही मर्यादा आली आहे. सार्वजनिक मंडळाची मूर्ती शक्यतो चार फुटांपेक्षा अधिक असता कामा नये. सांस्कृतिक कार्यक्रम टाळावे, त्याऐवजी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर घ्यावे. ज्ञानेश्वर चौधरी, मयूर पाटील, प्रमोद धनगर यांनी शांततेची ग्वाही दिली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आरिफ पठाण, इरफान कुरेशी, शफियोद्दीन पठाण, प्रकाश गुजर, प्रमोद धनगर, बापू पाटील, शेखर परदेशी, डॉ. कल्पक देशमुख, पराग देशमुख, कैलास लोहर, किशोर पावनकर, राजू पाडवी, संदीप गुजर, अनिल कासार, अर्जुन मराठे, प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी केले.