वडजाईत सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:01 IST2020-08-13T12:01:37+5:302020-08-13T12:01:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई येथे सेवानिवृत्त जवानांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचा ठिकठिकाणी सत्कार ...

Procession of retired soldiers in Wadjait | वडजाईत सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणूक

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
वडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई येथे सेवानिवृत्त जवानांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचा ठिकठिकाणी सत्कार झाला.
येथील प्रफुल अभिमन्यु सूर्यवंशी व योगेश संतोष निकम हे भारतीय सैन्य दलात २००३ मध्ये एकाचवेळी भरती झाले. १७ वर्षे सैन्यदलात सेवा देऊन ते ३१ जुलै २०२० रोजी सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आठवडाभरानंतर वडजाई गावी परिवारासह दाखल झाले. यावेळी गावातील तरुणांनी त्यांची मिरवणूक काढून सत्कार समारंभाचे आयोजन केले. ११ रोजी सायंकाळी वाहनात बसवून त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सरपंच कविता सूर्यवंशी, माजी नगरसेवक सतिष महाले यांनी निवृत्त जवानांचा सत्कार केला. अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रफुल अभिमन्यु सुर्यवंशी व योगेश संतोष निकम या जवानांनी सैन्यदलातील १७ वर्षाच्या कारकिर्दीतील चित्तथराक अनुभव कथन केले. विशाल सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Web Title: Procession of retired soldiers in Wadjait