न्याहळोदला मारुतीला फेरी मारून तर बिलाडीला दर्ग्याला फेरी मारून मिरवणूक, पोळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:35+5:302021-09-07T04:43:35+5:30
सध्या खरीप हंगामात पिकांवर मोठा खर्च केला असताना उत्पन्न येण्यास अवकाश आहे तरी शेतकऱ्यांनी उसनवारीचे पैसे घेऊन हा ...

न्याहळोदला मारुतीला फेरी मारून तर बिलाडीला दर्ग्याला फेरी मारून मिरवणूक, पोळा उत्साहात
सध्या खरीप हंगामात पिकांवर मोठा खर्च केला असताना उत्पन्न येण्यास अवकाश आहे तरी शेतकऱ्यांनी उसनवारीचे पैसे घेऊन हा सण साजरा केला. रात्रीच्या दमदार पावसाने हजेरी लावली. दिवसा मात्र पाऊस नसल्याने पोळ्याची तयारी करता आली. शेतात वीजपुरवठा बंद असल्याने बैलांची अंंघोळ करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल. राखून ठेवलेल्या बांधवरील गवत खाऊ घातले.
बैलांची सजावट करून न्याहळोदला मारुतीच्या मंदिरास फेरी मारून, तर बिलाडी येथे पीरबाबा दर्ग्याला फेरी मारून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .
बिलाडी येथे पीरबाबाचा दर्गा आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या वास्तूवर हिंदू-मुस्लिम समाजातील दोघे ध्वज लावले जातात, तर पोळ्याच्या दिवशी सर्व शेतकरी येथे बैलजोडी आणून नारळ फोडतात. येथे फेरी मारल्यावरच मिरवणुकीस जातात. हा सण साजरा होत असताना मुस्लिम युवक वाद्य वाजविण्यास उभा असतो.
पावसाची भीती व कोरोना परिस्थिती पाहता परंपरेला फाटा देत वेळेअगोदर सण साजरा करण्यात आला.
060921\dsc_6020a.jpg
न्याहळोद ला मारुती मंदिरास तर बिलाडी ला पीर बाबा दर्गा ला फेरी मारून पोळा मिरवणूक