तंबीनंतर कारवाई सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:31 IST2019-11-19T11:31:16+5:302019-11-19T11:31:51+5:30
अतिक्रमण : रस्त्यावरील व्यावसायिकांचे साहित्य केले जप्तलोकमत न्यूज नेटवर्क

Dhule
धुळे : शहरातील मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यासह व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमन केले आहे़ त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो़ यासाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्याचे साहित्य सोमवारी महापालिका अतिक्रमन निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमा केले़
आग्रारोड, पारोळारोड, कराचीवाला खुंट, पाचकंदील ऐशी फुटीरोड अशा चौकात फेरीवाल्यांनी जागा अडविली आहे़ त्यामुळे बाजारपेठेत रस्त्यावरून चालणाºयांना देखील जागा नसते़ वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी आमदार डॉ़ शाह यांनी दिलेल्या आदेशाचे मनपाकडून पालन केले जात आहे़ सोमवारी दुसºया दिवसाची कारवाई अग्रसेन पुतळा, आग्रारोड परिसरात कारवाई करण्यात आली तर पारोळा रोडवरील गोपाल टी समोर रस्त्यावर अतिक्रमन करून व्यवसाय करणाºया व्यवसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले़ तर वडजाई गावात अतिक्रमन करून बांधकाम सुरू असल्याची तक्रारीनुसार बांधकाम बंद करण्यात आले़ ही कारवाई अतिक्रमन निर्मूलन विभागाचे प्रसाद जाधव, भुषण जगदाळे, युवराज खरात, प्रविण पाटील आदींनी केली