धुळे बसस्थानकातील समस्या सोडवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:45 IST2019-11-20T11:45:16+5:302019-11-20T11:45:35+5:30
प्रवाशांची मागणी : आवारातच होते वाहन पार्किंग

धुळे बसस्थानकातील समस्या सोडवाव्यात
आॅनलाइन लोकमत
धुळे : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात गाड्या अस्ताव्यस्त लागणे, पार्किंगच्या सुविधेअभावी आवारात दुचाकी लावणे, अमळनेर, नंदुरबारकडे जाण्यासाठी असलेल्या प्रवाशी निवाऱ्यात दिव्यांची व्यवस्था नसणे यासह काही समस्या असून, त्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गाने केली आहे.
धुळे येथून गुजरात, मध्यप्रदेशसह राज्याच्या विविध भागात जाणाºया प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. येथील बसस्थानकाचे आवार प्रशस्त आहे. स्थानकात येणाºया-जाणाºया बसगाड्यांची संख्याही प्रचंड आहे. मात्र बसस्थानकात समस्याही तेवढ्याच आहेत. त्या सोडविण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
गाड्या लागतात अस्ताव्यस्त
बाहेर गावाहून येणाºया लांब पल्याच्या बस गाड्या नियमानुसार फलाटाला लागत असतात. मात्र ग्रामीण भागातून बस घेऊन येणारे काही चालक जागा मिळेल त्याठिकाणी गाड्या उभ्या करत असतात. त्यामुळे स्थानकात बºयाचदा कोंडी झालेली दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाºया बस चालकांनाही बसेस योग्यजागी उभ्या करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. असे झाल्यास बसस्थानकात होणारी कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
आवारातच दुचाकी पार्किंग
बसस्थानक परिसरात दुचाकी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता तो ठेका रद्द झालेला आहे. त्यामुळे सर्वचजण बसस्थानकाच्या आवारातच दुचाकी, चारचाकी वाहने उभी करीत असतात. त्यामुळे बसस्थानक आवारात गाड्या लावणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यात यावा अशीही मागणी होऊ लागली आहे.
दिव्यांची व्यवस्था करावी
चोपडा, नंदुरबारकडे जाणाºया प्रवाशांसाठी स्वतंत्र शेडची व्यवस्था केलेली आहे. मात्र तिथे दिव्यांची सोय नसल्याने अंधार असतो. येथे दिवे लावण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे.