राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:29 IST2021-01-14T04:29:58+5:302021-01-14T04:29:58+5:30
यावेळी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सुदामती गांगुर्डे, नथू दंडगव्हाळ, डॉ. संजय ...

राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण
यावेळी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सुदामती गांगुर्डे, नथू दंडगव्हाळ, डॉ. संजय शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. टी. सोनवणे, स्कूल कमिटी चेअरमन सुभाष जैन, कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज जैन, वसतिगृह चेअरमन एच. आर. गांगुर्डे, प्राचार्य ए. बी. मराठे, सर्व शाखांतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे उद्घाटन माजी शालेय समिती चेअरमन रामचंद्र भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीअंतर्गत मातोश्री आबाई तथा नर्मदा नारायण पाटील योगविद्या शिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे फलक अनावरण प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ए. बी. मराठे यांनी केले.
वादविवाद स्पर्धेत २८ विद्यार्थी संघांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. त्यात ८ स्पर्धकांनी व्यासपीठावर मते मांडली. स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रुती अशोक बोरस्ते (एस.पी.डी.एम. कॉलेज, नाशिक), द्वितीय उद्देश कृष्णा पवार (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), तृतीय योगेश्वरी राजेंद्र बिरारीस (सी. गो. पाटील महाविद्यालय, साक्री), ढाल विजेता संघ- अनिकेत प्रल्हाद ढमाले व ऋषभ सुशील चौधरी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांना देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून व्ही. एम. भोसले, एच. डी. पाटील यांनी काम पाहिले. ए. एच. आहेर, एम. एस. जाधव, एस. ए. शिंपी यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन के. यु. कोठावदे व एस. पी. एखंडे यांनी केले. आभार एस. ए. शिंपी यांनी मानले.