शिंदे विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:41 IST2020-02-01T12:40:51+5:302020-02-01T12:41:27+5:30
कुसुंबा : १९ विद्यार्थिनींना केले सायकल वाटप

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसुंबा :येथील एम.के. शिंदे विद्यालयात गुरूवारी बक्षीस वितरण समारंभ व विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माळी समाजाचे अध्यक्ष दिनेश रायते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव सुनीता शिंदे, नवनिर्वाचित सभापती रामकृष्ण खलाणे, पंचायत समिती सदस्य प्रा. विजय पाटील, रितेश परदेशी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र परदेशी, उपमुख्याध्यापक प्रमोद शिंदे, पर्यवेक्षक बी. एम. चौधरी, उपप्राचार्य एम. टी. यंडाईत, प्रा. तुषार देसले, प्रा. भरत पाटील, रवींद्र बोरसे, प्रा.प्रशांत साळुंखे, गोटन परदेशी, गणेश चौधरी, भटू चौधरी, विनायक पाटील, जब्बार शेख, दिनेश खैरनार, रोहित परदेशी, राजू सय्यद, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पंचायत समिती अंतर्गत एम.के.शिंदे विद्यालयात पाच किलोमीटर अंतरावर येणाऱ्या ग्रामीण भागातील १९ विद्यार्थीनींना सायकल वाटप ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र परदेशी, व प्रा.रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये बक्षीस मिळविणाºया विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रा.शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रा. रावसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व कार्यक्रम पार पडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले.