विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:39 IST2019-07-31T21:39:30+5:302019-07-31T21:39:47+5:30

प्रहार जनशक्ती पक्ष  : जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन, आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका

Prison-wide agitation for various demands | विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन

आंदोलनकर्त्यांना गाडीत बसवून नेतांना पोलीस कर्मचारी

धुळे : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी यासह शेतकरी, ओ.बी.सी., आदिवासी व सर्वसामान्य जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज जेलभरो आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी, ओबीसी, आदिवासी व सर्वसामान्य जनतेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. त्यांच्या समस्या शासनाने सोडवाव्यात. दरम्यान शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीच्या पेरणी ते कापणीपर्यंत कामाचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा, दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांना दुष्काळी अनुदान द्यावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसीसाठी स्वतंत्र घरकूल योजना करून आर्थिक तरतूद करावी, आदिवासींचे प्रलंबित वनहक्क, जमीनपट्टे, त्वरित वाटप करावेत, कांदा, तूर उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान द्यावे, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन , मोबदला व नोकरी द्यावी, दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकºयांना बियाणे, खत व आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, स्वप्नील जाधव, डॉ. राजेंद्र पाटील, ईश्वर बोरसे, पंकज सिसोदीया, कैलास भदाणे, संजय सरग, दिलीप दगडे, भूषण अहिरे, सरला खैरनार, कविता पाटील, संजय विभांडीक, कैलास तिरमले आदी उपस्थित होते. 

Web Title: Prison-wide agitation for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे