धुलिवंदननिमित्त विविध रंग खरेदीला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:10 IST2020-03-08T23:10:19+5:302020-03-08T23:10:42+5:30
पाण्याची नासाडी टाळावी : ‘कोरोन’मुळे काही मंडळाकडून होळी साजरी न करण्याचा घेतला निर्णय

धुलिवंदननिमित्त विविध रंग खरेदीला प्राधान्य
धुळे : होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन. धुलिवंदनाचे नाव काढताच आठवते ती विविध रंगांची उधळण, पिचकारींमधून उडणारे रंगमिश्रित पाणी, अशा या रंगोत्सवाचे तरुणाईला वेध लागले आहेत. त्या पार्श्वभुमीवर बाजारात होळीची चाहूल दिसू लागली आहे. विविध प्रकारचे रंग व पिचकाऱ्यांनी दुकाने सजली आहेत. दरम्यान होळीनिमित्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
होळीचा बाजार हा बदलता बाजार आहे. मागील वर्षीचा ‘ट्रेन्ड’ यंदाही राहिलच याची कोणतीही शाश्वती नसल्याने ‘इस साल कुछ नया’ म्हणत विक्रे यांनी खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. धुळे शहरामध्येही चौका-चौकात होळी व धुलिवंदनानिमित्ताने दुकाने थाटली गेली आहेत. दोन दिवसांपासून खेरदीला पसंदी दिली जात आहे़
तोंडाला लावण्यासाठी मेकअप
तोंडाला रंग लावण्याची हौस ही प्रत्येकालाच असते. परंतु रासायनिक रंग चेहºयाला लावल्यास त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे सिल्वर ट्यूबला सध्या बाजारात बंदी दिसून येत आहे. परंतु तोंडाला रंग लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मेक अप ट्यूब बाजारात आल्या आहेत.
यामध्ये हिरवा, लाल, निळा, गोल्डन अशा विविध रंगामध्ये या ट्यूब आल्या आहेत. या मेक अप ट्यूबची सहा रुपयाप्रमाणे विक्री होत आहे.
रंग खेळण्यासाठी स्प्रे
रंग खेळण्यासाठी तो तयार करावा लागतो. नंतर तो आपण दुसºयाच्या अंगावर टाकतो. परंतु सध्या तयार रंगाचे विविध स्प्रे बाजारात आले आहेत. काही स्प्रे इको-फ्रेंडलीही आहेत. सध्या बाजारात १००, २००, ३०० मिलीचे स्प्रे विक्रीस आले आहेत. याची किंमत ३० रुपयापासून ते ५०-६० रुपयापर्यंत आहे. बाजारात सध्या सेंटेड हार्बल स्प्रेची धूम आहे.
मलिंगा, कोंबडा टोप्या
होळी निमित्त विविध प्रकारच्या टोप्याही आल्या आहेत. सध्या मलिंगा, कोंबडा, केसाच्या टोप्यांची चांगलीच चलती बाजारात आहे. गोल टोपी, साधी टोपी, फॅन्सी टोपी असे विविध प्रकार बाजारात विक्रीस आल्या आहेत. मलिंगा टोपीची किंमत १५० ते २०० रुपये आहेत. तर इतर टोप्या ५० रुपयापासून १५० ते २०० रुपयापर्यंत विक्री होत आहे.