साक्री तालुक्यातील सहा वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, व विद्यार्थी विद्यार्थिनी करिअर कट्टा उपक्रमात सहभागी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST2021-08-19T04:39:38+5:302021-08-19T04:39:38+5:30
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र तसेच साक्री तालुक्यातील उत्तमराव पाटील महाविद्यालय ...

साक्री तालुक्यातील सहा वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, व विद्यार्थी विद्यार्थिनी करिअर कट्टा उपक्रमात सहभागी.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र तसेच साक्री तालुक्यातील उत्तमराव पाटील महाविद्यालय दहिवेल, सी.गो.पाटील महाविद्यालय साक्री, कर्म. आ.मा. पाटील महाविद्यालय पिंपळनेर, आदर्श महाविद्यालय निजामपूर, विमलबाई पाटील महाविद्यालय साक्री, कै. आर. डी. देवरे महाविद्यालय म्हसदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करियर कट्टा आपल्या दारी’च्या ऑनलाइन सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.टी.सोनवणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, प्राचार्य डॉ.ए.पी. खैरनार, प्राचार्य डॉ. पी. एस. सोनवणे, प्राचार्य डॉ.सुरेश अहिरे, प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, करियर कट्ट्याचे धुळे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक यशवंत शितोळे पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, त्यांच्या ज्ञानाला व अभ्यासाला योग्य दिशा मिळावी यासाठी करियर कट्ट्याची निर्मिती करण्यात आली आहे. संविधानाचे वाचन आणि विवेचन, चालू घडामोडींचे अध्ययन, उद्योजक तसेच मंत्रालयीन अधिकारी बँकेचे अधिकारी आपल्या भेटीला अशा विविध उपक्रमांची मांडणी करियर कट्टाच्या माध्यमातून केली जात असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. ए. पी. खैरनार, प्राचार्य डॉ.पी.एस. सोनवणे, प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे, प्राचार्य डॉ. सुरेश अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.एस. टी. सोनवणे यांनी ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये परिश्रम करण्याची वृत्ती व ज्ञान मुबलक प्रमाणात असते. या ज्ञानाला व परिश्रमाला योग्य मार्गदर्शनाची व संधीची आवश्यकता असते. ही संधी तथा मार्गदर्शन करियर कट्ट्याच्या माध्यमातून होत असल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशा संबंधी आशादायी वातावरण निर्माण होताना दिसत आहे, असे प्रतिपादित केले . विद्यार्थ्यांनी देखील या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन संधीचे सोने करावे, असेदेखील त्यांनी प्रसंगी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करियर कट्ट्याचे जिल्हा समन्वयक डॉ सचिन नांद्रे यांनी केले.
कार्यक्रमाचे संचलन प्रा अजबराव इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सचिन गोवर्धने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध महाविद्यालयातील कार्यशाळा समन्वयक प्रा. के. डी. कदम, प्रा डी. बी. भामरे, डॉ सचिन गोवर्धने, डॉ. शरद सोनवणे, प्रा. अजबराव इंगळे यांनी परिश्रम घेतले. ऑनलाईन पार पडलेल्या विचार सभेस साक्री परिसरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बांधव, तसेच स्पर्धा परीक्षासंबंधी अध्ययन करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.