शिरपूर येथे क्रीडापटूंचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:43 IST2021-09-10T04:43:06+5:302021-09-10T04:43:06+5:30

यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, विश्वस्त व कुलसचिव रोहित रंधे, दिलीप देवरे, मुकेश वर्मा, अंकिता लोखंडे, ...

Pride of athletes at Shirpur | शिरपूर येथे क्रीडापटूंचा गौरव

शिरपूर येथे क्रीडापटूंचा गौरव

यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, विश्वस्त व कुलसचिव रोहित रंधे, दिलीप देवरे, मुकेश वर्मा, अंकिता लोखंडे, प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील, व्यवस्थापक ए.ए. पाटील, किशोर बच्छाव, उपप्राचार्य डॉ. फुला बागूल, उपप्राचार्य पी.जी. पारधी, सदाशिव ठाकरे, कार्यालयीन अधीक्षक संजय निकम उपस्थित होते. तसेच लाइफ स्कील डेव्हलपमेंट योगा ॲण्ड वेलनेस या क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाइन कोर्सचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. एल.के. प्रताळे यांचे योगा व फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स या दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

क्रीडानगरीतील खेळाडूंचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात नयन सोनवणे, मनीष जाट, सुनीता पावरा, सूरज शिरसाठ, ललित गिरासे, श्रद्धा सोनगडे, राज पाटील, राजश्री भामरे, महेंद्र सोनवणे, हर्षवर्धन वाघ, अल्पेश यादव, प्रीती शिरसाठ, विनोद धनगर, हेमंत शिरसाठ, लुकेश सिसोदिया या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, विद्यापीठस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा व त्यांच्या आई-वडिलांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन भरत कोळी यांनी केले, तर आभार प्रा. राधेश्याम पाटील यांनी मानले.

Web Title: Pride of athletes at Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.