धुळे : कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात चक्रीवादळात वित्त व जीवितहानी झाली होती़ याठिकाणी जावून धुळ्याच्या राज्य राखीव पोलीस दलातील ५ अधिकारी आणि ६२ कर्मचाºयांच्या पथकाने मदत केली़ या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा रविवारी सन्मान करण्यात आला़राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर सकाळी सन्मान सोहळा पार पडला़ यावेळी जिल्हा समादेशक संजय पाटील, सहायक समादेशक सदाशिव पाटील यांच्याहस्ते अधिकारी आणि कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक आणि रिवार्ड देवून गौरव करण्यात आला़ पथकाने पश्चिम किनारपट्टीवरील कोकण विभागात निसर्ग चक्रीवादळामुळे या भागात विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याकामी दलातील अधिकारी आणि जवानांनी अहोरात्र परिश्रम घेतले़ तसेच लळींग धबधबा येथे पाय घसरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता़ त्यांचाही पथकाने शोध लावला़ या कामाचीही दखल याप्रसंगी घेण्यात आली़
चक्रीवादळात उल्लेखनीय काम करणाऱ्या ६७ पोलिसांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 22:50 IST