भाव घसरणीचा धस्का, कांदा काढण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST2021-03-10T04:35:55+5:302021-03-10T04:35:55+5:30
हमीभावापेक्षा कमी भाव नको, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात कांदा ४० ते ...

भाव घसरणीचा धस्का, कांदा काढण्यास सुरुवात
हमीभावापेक्षा कमी भाव नको, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री होत होता. मात्र अचानक या आठवड्यात निम्म्यावर २०-२१ रुपयांवर आला. अजून भाव घसरून कवडीमोल भावाने कांदा विक्री करावा लागू नये म्हणून येथील शेतकर्यांनी हे पीक काढायला सुरुवात केली आहे. अन्यथा अजून कांदा पूर्ण तयार व्हायला एक महिन्याचा कालावधी लागला असता. यामुळे वजनात घट येणार यासाठी शेतकरी हा कुठेना कुठे नाडलाच जात असल्यामुळे कुठे गेला तुमचा हमीभाव, अशी विचारणा करताना दिसून येत आहे.
दोन हजार रुपये क्विंटल गहूदेखील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या १५००- १६०० क्विंटलने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरादारात उत्पादन आले की भावात घसरण ही नित्याची बाब झाली आहे. यामुळे हमीभावापेक्षा कमी भाव नको याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया..... शेतकऱ्यांच्या घरादारात उत्पादन आले की भावात घसरण ही आमच्या नशिबाचा भाग आहे. ४० रुपयांचा कांदा २० रुपये झाला. तो पाच रुपये किलोने विकावा लागू नये म्हणून आज तयार होण्याच्या अगोदर इच्छा नसताना काढावा लागला. कुठे गेला तुमचा हमीभाव. यामुळे शेती तोट्याची ठरत आहे.
वामन माळी, शेतकरी,
मालपूर, ता. शिंदखेडा