बाजारात भुईमूगाला मातीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:06 IST2019-11-13T12:05:18+5:302019-11-13T12:06:29+5:30
कापडणे : चिखलातून भुईमूग काढून सुकविण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न

Dhule
कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे शिवारासह संपूर्ण परिसरात परतीच्या पावसाने शेती पिकांना जबर फटका बसलेला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील भुईमूगासह सर्वच शेती पिके खराब झालेली आहेत. यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.
अति पावसामुळे कापडणे येथील शेकडो शेतकऱ्यांचे भुईमूग शेंगांचे पिक व शेंगांचा पाला खराब झाले आहे. जमिनीतच शेंगांना कोंब फुटले असून चारा पाण्यात सडून संपूर्ण भुईमूग पिकच वाया गेले आहे. त्यात जे थोडेफार पिक वाचले आहे. अशा ओल्या व चिखलाने माखलेल्या भुईमूग शेंगाना शेतातून काढून शेतकरी घरी आणून धाब्यावर ऊन दाखवून शेंगा कोरड्या करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
शेतकरी शालीग्राम नथू पाटील व ज्ञानेश्वर पुंजू पाटील यांच्या शेतातील भुईमूग शेंगांचा गुरांसाठी असलेला पाला संपूर्ण खराब झालेला आहे. कापडणे शिवारात सर्वत्र शेतकºयांचे भुईमूग पिकाचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे. या सर्व शेतकºयांना शासनाने योग्य ती भरपाई द्यावी. पीक विम्याची मुदत मिळायला हवी, असे मागणी येथील शेतकºयांकडून होत आहे.