Presentation of plays and folk arts | नाटिका व लोककलांचे सादरीकरण

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
होळनांथे : येथील आर.सी. पटेल माध्यमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक तपनभाई पटेल, जिल्हा परिषद सदस्या भैरवी शिरसाठ, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश शर्मा, अजंदेच्या सरपंच सिंधुबाई पाटील, बाजार समितीचे चेअरमन नरेंद्रसिंग सिसोदीया, सुभाष कुलकर्णी, पं.स. सदस्य लताबाई राजपुत, विजय बागुल, केंद्रप्रमुख किशोर गाडीलोहार, भावेरचे सरपंच लहु गुजर, प्रकाशसिंग सिसोदिया, प्रमोद राजपुत, तुळशिराम मराठे, डॉ.बी.एम. खानकरी, पंकज राजपुत, भटूसिंग राजपुत, महेंद्र राजपुत, डॉ.जितेंद्र राजपुत, ओमेंद्रसिंग राजपुत, रमेश कोळी, संजय भांडारकर आदी उपस्थित होते.
सुरुवातीला स्वागत ईशस्तवन सादर करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक व्ही.पी. दीक्षित यांनी केले. त्यांनी वर्षभरात शाळेत राबविले जाणारे उपक्रम व शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला. तसेच विविध स्पर्धेतील विजेते, वर्षभरात विविध परीक्षेत, क्रीडा क्षेत्रात, शालेय कार्यक्रमांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.
यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लावणी, भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती, बेटी बचाव, स्वच्छता अभियान व हास्य गीतांसह एकसे बढकर एक कलाविष्कार सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.बी. चौधरी, बी.डी. सूर्यवंशी, प्रतिभा देशमुख, डी.डी. जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Presentation of plays and folk arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.