राहुल गांधींच्या सभेसाठी मैदान सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:18 IST2019-02-28T22:17:35+5:302019-02-28T22:18:19+5:30

तयारी पूर्णत्वास : श्वान पथकाकडून सभास्थळाची पाहणी

 Prepare the field for Rahul Gandhi's meeting | राहुल गांधींच्या सभेसाठी मैदान सज्ज

dhule

धुळे : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शहरातील एसएसव्हीएस महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी १ वाजता सभा होणार आहे़ या सभेसाठी जय्यत तयारी पूर्ण होत आली असून पोलिसांसह श्वान पथकाकडून सभास्थळासह या संपूर्ण परिसरात कसून तपासणी केली जात आहे़
येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास होणाऱ्या सभेचे आयोजन जिल्हा कॉँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. सभेला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मोठ्या स्वरुपात मंडपाची उभारणी करण्यात आली आहे़ सभेचे व्यासपीठ हे विज्ञान महाविद्यालयाच्या बाजूला उभारले आहे़ व्यासपीठावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे़उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस कडून बैठका घेण्यात येत असून दैनंदिन आढावा देखील घेतला जात आहे़ याकामी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण हे स्वत: सभेचे नियोजन करत असून काम अंतिम टप्पप्यात पोहचले आहे़ साक्री, पिंपळनेर कडून येणाºया नागरिकांनी आपली वाहने साक्रीरोडवरील संतोषी माता चौक, सावरकर पुतळा, नदीकिनारचा नवीन रस्ता मार्गे पॉलिटेकनिक महाविद्यालय येथे पार्कीग करावे चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, जळगावकडून येणाºया नागरिकांसाठी बायपासरोडने बिलाडी फाटाकडून एसएसव्हीपी एस मार्ग पॉलिटेकनिक महाविद्यालय, शहरातील नागरिकांनी देवपूर बस स्टॅडच्या मार्गे पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे़ सर्व नागरिकांनी सभेला येतांना समुहाने असे जिल्हा पोलीस दलाने केले आहे़

Web Title:  Prepare the field for Rahul Gandhi's meeting

टॅग्स :Dhuleधुळे