प्रेमवीराची आत्महत्या, प्रेयसी बचावली
By Admin | Updated: March 27, 2017 23:53 IST2017-03-27T23:53:39+5:302017-03-27T23:53:39+5:30
पहाटेची घटना : गावक:यांनी झाडावरून ओढले मुलीला खाली

प्रेमवीराची आत्महत्या, प्रेयसी बचावली
पिंपळनेर : पिंपळपाडा येथील प्रेमीयुगुलाने सोमवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्येचा प्रय} केला. यात प्रेमवीराचा मृत्यू झाला तर ग्रामस्थांच्या वेळीच मदतीने प्रेयसी बचावली आहे. जयराम आप्पा गायकवाड (19) असे मृत मुलाचे नाव आहे.
पिंपळपाडा येथील रामू भु:या बागुल यांच्या शेतात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत 19 वर्षीय जयरामचे आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा पिंपळपाडा येथील 22 वर्षीय तरुणीवर प्रेम जडले. परंतु, त्यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले हे कळू शकलेले नाही.
या दोघांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यात आधी जयराम याने त्या मुलीच्या ओढणीने झाडाला फास घेतला. त्यानंतर जयरामची प्रेयसी फाशी घेत असताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ तिला खाली उतरवून उपचारार्थ पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जयरामचे वडील आप्पा सोनू गायकवाड यांनी दिलेल्या माहितीवरून पिंपळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
आत्महत्त्या करण्याचे कारण अस्पष्ट
या मुलीने जबाबात जयराम गायकवाड याच्यावर प्रेम असल्याचे कबूल केले आहे. परंतु, त्याने आत्महत्या का केली यासंदर्भात तिने मौन बाळगले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल आर. के. रणधीर करीत आहेत.