कोरोना संक्रमणात गरोदर मातांनी शिशुची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:48 IST2020-04-07T12:45:00+5:302020-04-07T12:48:27+5:30
या काळात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता

dhule
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
‘कोरोना विषाणू मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारा आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे़ कोरोना विषाणूचा धोका मुख्यत: ज्येष्ठ नागरिक, नवजात बालक तसेच गरोदर मातांना अधिक असतो़ त्यांनी या काळात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे़ असा सल्ला स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ़ मेघना विशाल पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिला ़
प्रश्न : कोरोना संक्रमण काळात गरोदर महिलांना कशी काळजी घ्यावी?
उत्तर : कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे़ ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते़ बाधित व्यक्तीपासून गरोदर माता व नवजात बालकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता असते. या काळात गरोदर मातांनी शक्य असल्यास घरातच राहावे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, तोडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर जावू नये, वेळोवेळी हाताला सॅनिटायझर लावावे़
प्रश्न : नवजात बालकांना कोरोनाची लागण होऊ शकते का?
उत्तर : रॉलय गायनोलॉजिक्स महाविद्यालयाने दिलेल्या अहवालानुसार गरोदर मातेपासून नवजात बालकांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ परंतु आतापर्यत राज्यात बोटावर मोजण्या इतके उदाहरण समोर आले आहे़ त्यातील बाधीत असलेले सर्व बालक उपचारानंतर पुर्णत: बरे झाले आहेत़ धोका जरी टळला असला तरी कोरोना संक्रमणाच्या काळात दक्षता घेणे महत्वाचे आहेत़ आपली दक्षता आपल्या मुलांचे भविष्य घडवू शकते़
प्रश्न : गरोदर मातांना नियमित दवाखान्यात तपासणी करावी का?
उत्तर : गरोदर मातांनी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी शक्यतो़, घराबाहेर पळू नये असा सल्ला वेळोवेळी देण्यात येत आहे़ गरोदर काळात दम लागणे, मोठ्याने श्वास घेणे, थकवा येणे, चक्कर, मळमळ असा त्रास होतो़ मात्र घाबरून किंवा वेगळा विचार न करता तातडीने डॉक्टराशी संपर्क साधावा़ बाळाला स्तनपान करतांना हात स्वच्छ धुवावे तसेच घर व परिसरात स्वच्छता ठेवावी़
भीती बाळगू नका; डॉक्टरांचा सल्ला घ्या !
कोरोनाबाबत अद्याप पुरेशाप्रमाणात जनजागृती समाजामध्ये नसल्याने सर्दी किंवा खोकला जरी झाला तरी घाबरून डॉक्टरांकडे येतात़ मात्र घाबरून जावू नका, पण खबरदारी देखील घेण्याची गरज आहे़शंभर पेक्षा जास्त ताप, सर्दी, सतत खोकला, श्वास घेण्याचा त्रास तसेच संशयित व्यक्तीशी संर्पक आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या़
हातधुतल्या शिवाय मुलांना स्पर्श करू नका
आपल्या हातावरील विषाणू नाका, तोंडाद्वारे शरीरात शिरकाव करतात़ त्यामुळे कोरोना सारखा महाभयंकर आजार होण्याचा धोका असतो़ हा धोका टाळण्यासाठी वेळोवेळी हातधुणे महत्वाचे आहे़ शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे किंवा बाहेरून आल्यानंतर मुलांना स्पर्श करण्यापूर्वी हात पाय पाण्याने स्वच्छ धुवावे़ आपली काळजी परिवाराला सुरक्षित ठेवू शकते असेही डॉ़पाटील यांनी सांगितले़