लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; तीन केंद्रावर पाचींनी घेतला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:26 IST2021-07-18T04:26:01+5:302021-07-18T04:26:01+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर त्यापासून बचाव व्हावा यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केंद्र अथवा राज्य शासनाकडे नव्हती़ परिणामी मास्क ...

लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; तीन केंद्रावर पाचींनी घेतला डोस
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर त्यापासून बचाव व्हावा यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केंद्र अथवा राज्य शासनाकडे नव्हती़ परिणामी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करणे आणि गर्दी न जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या़ त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात होती़ ज्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होत होती. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती़ कालांतराने लस उपलब्ध झाल्यामुळे शासकीय पातळीवर आणि खासगी दवाखान्यात लसीकरण करणे सुरू झाले़ महिला आणि पुरुषांनी त्यात सहभाग घेतला असलातरी गर्भवती महिला मात्र कुठेही दिसत येत नव्हत्या़ पहिल्या लाटेत जी स्थिती होती तीच स्थिती दुसऱ्या लाटेतदेखील सारखीच असल्याचे दिसून येत आहे़ गर्भवती महिला पुढे येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे़
दोन जिवांची भीती
- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे़ याची पूर्ण कल्पना आहे़ पण, पोटात बाळ असल्यामुळे त्याला धोका नको यासाठी लस घेण्यास हिम्मत होत नाही़
गर्भवती स्त्री
- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे़ पण, बाळ पोटात असल्यामुळे मनात भीती आहे़ लसीकरणाचा बाळा धोका होऊ नये, असे वाटतं.
गर्भवती स्त्री
न घाबरता लस घ्या
नागरिकांनी आपापल्या भागातील केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे़ लसीकरणापासून काहीही धोका नाही़ कोणत्याही प्रकारची शंका मनात बाळगू नये़ लसीकरण करून घेण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे़
तीन लसीकरण केंद्रावर लोकमत
वर्गवारी एकूण पहिला दुसरा
लसीकरण डोस
शासकीय रुग्णालय
स्त्री २२ १८ ०४
पुरुष ३१ २४ ०७
गर्भवती ०१ ०० ००
मनपा रुग्णालय
स्त्री ४० ३६ ०४
पुरुष ५२ ४२ १०
गर्भवती ०२ ०१ ०१
प्रभात नगर दवाखाना
स्त्री ४४ ३५ ०९
पुरुष ६० ४० २०
गर्भवती ०२ ०२ ००