कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य द्या; पालकमंत्र्यांच्या सूचना : पाऊस, पिकांचा अहवाल देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST2021-08-15T04:37:08+5:302021-08-15T04:37:08+5:30

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी आमदार किशोर दराडे, आमदार मंजुळा गावित, ...

Prefer a second dose of corona vaccination; Instructions of Guardian Minister: Instructions for reporting rains and crops | कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य द्या; पालकमंत्र्यांच्या सूचना : पाऊस, पिकांचा अहवाल देण्याच्या सूचना

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य द्या; पालकमंत्र्यांच्या सूचना : पाऊस, पिकांचा अहवाल देण्याच्या सूचना

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी आमदार किशोर दराडे, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, सुरेखा चव्हाण, गोविंद दाणेज, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मात्र, तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने दक्षता बाळगावी. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती द्यावी. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑक्सिजन उपलब्धतेचे काटेकोरपणे नियोजन करावे. ते करतानाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने कार्यान्वित होतील, अशी दक्षता घ्यावी. धुळे शहरासह जिल्ह्यात डेंग्यू तापाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्यासाठी कंटेनर सर्वेक्षणाचे नियोजन करावे. आवश्यक तेथे धुरळणी, फवारणी करावी.

जिल्ह्यात पावसाचा खंड पडला असून, कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक अहवाल राज्य शासनाला पाठवून अवगत करावे. जमिनीच्या पोतनुसार पिकांचे नियोजन करण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी. तसेच ई-पीक पाहणी उपक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा सूचना त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या चार आहे. एकूण ४५ हजार ८४७ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४५ हजार १२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर १.५७ टक्के एवढा आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८.४२ टक्के आहे. कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या कमी असली, तरी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ६६ लाख ५३ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ११ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची संख्या १६ असून, त्यांची क्षमता १२ टन आहे. पीएसए प्रकल्पांपैकी सहा कार्यरत असून, १० प्रस्तावित आहेत. ऑक्सिजन सिलिंडर ३,५९८ प्रस्तावित असून ३,५६८ उपलब्ध आहेत. याशिवाय एएसयू एकूण ३,६२२ प्रस्तावित असून, त्यापैकी ३,५७७ उपलब्ध आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध होईल.

महानगरपालिकेचे आयुक्त शेख यांनी डेंग्यू तापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थितीविषयी, तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

बोरकुंडला विकासकामांचे भूमिपूजन

जिल्हा परिषदेच्या बोरकुंड व रतनपुरा, ता. जि. धुळे गटातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते शनिवारी दुपारी झाले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पीक परिस्थितीची माहिती घेत असून, याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात येईल. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Prefer a second dose of corona vaccination; Instructions of Guardian Minister: Instructions for reporting rains and crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.