नेर येथे पुर्ववैमनस्यातून हाणामारी, ६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:18 IST2018-03-01T19:18:18+5:302018-03-01T19:18:18+5:30
जुना वाद उफाळला : १८ जणांविरुध्द गुन्हा

नेर येथे पुर्ववैमनस्यातून हाणामारी, ६ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोन महिन्यांपुर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून धुळे तालुक्यातील नेर गावात एकास घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली़ ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़
याप्रकरणी रामदास ताराचंद मगरे (कोळी) रा़ कोळी गल्ली, नेर या तरुणाने धुळे तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली़ दोन महिन्यांपुर्वी नेर गावातील फाटा येथे रामदास मगरे याचे तुषार विठ्ठल बोढरे याच्यासोबत भांडण झाले होते़ त्याची कुरापत काढून बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तुषार बोढरेसह यशवंत महादू माळी, दत्तू यशवंत माळी, सागर यशवंत माळी, राजेंद्र महाजन (पूर्ण नाव माहित नाही), नामदेव राजेंद्र महाजन, वाल्मिक राजेंद्र महाजन, दिलीप सुकलाल माळी, एकनाथ सुकलाल माळी, प्रकाश सुकलाल माळी, पज्यू दशरथ अहिरे, मनोज दिलीप माळी, रावसाहेब सुरेश खलाणे, राकेश रावसाहेब माळी, अधिकार सुकदेव रोकडे, नितीन खोडू माळी, गणेश भिका माळी, सोनू भगवान माळी (सर्व रा़ नेर ता़ धुळे) या संशयितांनी हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी पट्या घेवून रामदास मगरे याच्या घरात घुसले़ त्याच्यासह घरातील इतरांना मारहाण केली़
या मारहाणीत रामदास मगरे याच्यासह मिनाबाई ताराचंद मगरे, दिलीप गिरधर मगरे, लताबाई दिलीप मगरे, सीमाबाई वसंत मगरे, बकूबाई मधुकर मगरे यांना दुखापत झाली़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
याप्रकरणी रामदास मगरे याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए़ के़ वळवी करत आहे़