दत्तवायपूर सरपंचपदी प्रतिभा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:26+5:302021-02-17T04:42:26+5:30
दत्तवायपूर - दत्तवायपूरच्या सरपंचपदी प्रतिभा आधार पाटील यांची तर उपसरपंचपदी दत्तात्रय बाबूलाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिंदखेडा ...

दत्तवायपूर सरपंचपदी प्रतिभा पाटील
दत्तवायपूर - दत्तवायपूरच्या सरपंचपदी प्रतिभा आधार पाटील यांची तर उपसरपंचपदी दत्तात्रय बाबूलाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री गुरुदत्त परिवर्तन पॅनलच्या सात जागा निवडून आल्या होत्या. दत्तवायपूर येथे सरपंचपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला गटासाठी पडल्याने सरपंचपदी प्रतिभा आधार पाटील व उपसरपंचपदी दत्तात्रय बाबूलाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री गुरुदत्त परिवर्तन पॅनलचे दत्तात्रय बाबूलाल पाटील, किरणबाई साहेबराव पाटील, प्रतिभा आधार पाटील, गंगाराम हरचंद बागुल, लक्ष्मी सुनील बागुल, रेखाबाई धाकू सूर्यवंशी, मीराबाई किसन पाटील हे विजयी झाले होते.
या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. आर. जी. खैरनार, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष लखन रुपनर, संतोष पाटील आदींनी स्वागत केले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पी. के. सावंत, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून एच. बी. बोरसे यांनी काम पाहिले. पोलीस हेडकाॅन्स्टेबल विकास मराठे, ग्रामपंचायतीचे शिपाई राजाराम लोहार, कोतवाल प्रकाश शिरसाठ आदींनी यावेळी बंदोबस्त ठेवला होता.