खुडाणे सरपंचपदी प्रमिला देवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:42 IST2020-03-20T12:41:48+5:302020-03-20T12:42:10+5:30
बिनविरोध निवड : सात महिन्यांपासून प्रशासकाची होती नियुक्ती

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : साक्री तालुक्यात खुडाणे ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी प्रमिलाबाई पांडुरंग देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
खुडाणे ग्राम पंचायतीचे एकूण ११ सदस्य आहेत. तीन सदस्य अपात्र झालेत. आठ सदस्य उपस्थित होते. साधारणत: सात महिन्यांपासून ग्राम पंचायतीवर प्रशासक नियुक्ती होती. १९ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी विजय बावा यांच्या अध्यक्षते खाली विशेष सभा झाली. ग्रामसेवक मोहिते उपस्थित होते.
प्रमिलाबाई पांडुरंग देवरे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. उपस्थित सदस्यांमध्ये अशोक डोंगर खलाणे, कन्हैयालाल बाबूलाल काळे, मंडाबाई चैत्राम सोनवणे, केवळबाई उत्तम हेमाडे, महारु कुसन माळचे, मंडाबाई गंगाधर भदाणे, मूलकनबाई मोहन वाघ यांची उपस्थिती होती.
गट नेते शरद परशराम गवळे, अशोक शंकर गवळे, युवराज गोकुळ गवळे, ज्ञानेश्वर गवळे, वासुदेव यशवंत खैरनार आदींनी यानिवडीबद्दल स्वागत केले.