धुळे : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिर बांधकामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ आॅगस्ट रोजी होत आहे़ या कार्यक्रमासाठी न्यासकडून सदस्य प्रदीप कर्पे यांना आमंत्रण आल्याने ते मंगळवारी सायंकाळी अयोध्येला पोहोचले. ते बुधवारच्या कार्यक्रमात सहभागी होतील.अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर शिलान्यास समितीचे सदस्य प्रदीप कर्पे यांना न्यासकडून निमंत्रण मिळाले होते. ते सोमवारीच अयोध्याच्या दिशेने रवाना झाले़ मंगळवारी सायंकाळी ते अयोध्या येथे पोहचले आहेत़ त्यांनी कार्यक्रमास आलेल्या संत, महंताचे दर्शन घेतले. न्यासच्या सदस्यांसोबत तेही बुधवारी आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहे. धुळे येथून राजू महाराज हे पंधरा दिवसापूर्वी पायीच कार्यक्रमासाठी अयोध्येला निघाले आहेत. ते अयोध्येला पोहोचले आहे. मात्र त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते.
धुळ्याचे प्रदीप कर्पे अयोध्येला पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 21:39 IST