शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

परदेशासह भारतातील भावी डॉक्टरांचा धुळ्यातून अभ्यास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:36 IST

सत्कार्योत्तेजक सभेचे योगदान : प्राचीन संदर्भ ग्रंथ असलेली उत्तर महाराष्ट्रातील एकमेव संस्था 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळयातील एकेकाळचे ख्यातनाम फौजदारी वकील शंकरराव देव यांनी समर्थ रामदास स्वामींच्या मंदीर उभारणीत पुढाकार घेऊन श्री समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना केली़ येथील ग्रंथालयाला प्राचीन ग्रंथसंपदेचा वारसा लाभल्याने परदेशासह भारतातील भावी डॉक्टरांनी धुळ्यातून पीएचडीचा अभ्यास केल्याची नोंद संस्थेत आहे़मोडी, हिंदी, संस्कृत, अरबी भाषेतील संदर्भ ग्रंथ धुळ्यात नानासाहेब देव यांच्या संशोधनातून असंख्य मोडी कागदपत्रे या ठिकाणी अस्तित्वात आहेत़ येथील २ हजार मोडी कागदपत्रांचे मोडी लिप्यंतराचे काम पूर्ण झाले आहे़ संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, अर्धमागधी, चरित्र, आत्मचरित्र, कथा कांदबºया, नाटक, प्रवास वर्णने, एकांकिका, बालसाहित्य, महाभारत, श्रीभागवत, रामायण, दासबोध, वेद, पुराणे, उपनिषद, आरोग्य, तत्वज्ञान, ज्योतिष, आयुर्वेद अशी विविध विषयांचे १३ हजार २२३ पृष्ठांच्या १७३ ग्रंथाचे प्रकाशन देखील झाले  आहे़ प्राचीन ग्रंथसंपदा असलेले उत्तर महाराष्ट्रात एकमेव अभ्यासकेंद्र  समर्थ वाग्देवता मंदिरात प्राचीन ग्रंथ संपदा असल्याने आतापर्यत  नागपूर, पूणे, धुळे, औरंगाबाद, जालना, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह परदेशातील अभ्यासकांनी येथील साहित्यावर अभ्यास करून  पीएचडी पूर्ण केली आहे़ येथे सुमारे १०० ते ६०० वर्षांपूर्वीची कागदपत्रे, ऐतिहासिक दस्तावेज अभ्यासकांना उपयोगी पडणारे आहेत़ पीएच.डी. मिळालेल्या अभ्यासकांचे  अनेक शोधनिबंध गं्रथालयात उपलब्ध आहेत़ चार हजार ग्रंथातील बहूविध विषयांवर संशोधनशिवकालीन व समर्थकालीन हस्ताक्षरांचे नमुने व ग्रंथ संग्रहांसोबत  प्रतापगडाच्या देवीचे शिक्के उतरविलेला कागद, बोटाच्या चिमटीत मावतील एवढ्या आकाराच्या दोन सुवाच्य भगवद्गीता, दोन ताम्रपट, एकाच कागदावर मावतील असे २०५ मनाचे श्लोक, श्रीसमर्थ शिष्य-प्रशिष्य-सांप्रदायिक अशा लहानथोर ग्रंथकारांचे विविध भाषांमधील ग्रंथ, अनेक बखरी, त्याशिवाय व्याकरण, संगीत, रागदारी, जमाखर्च, गणित, मंत्रतंत्र, आयुर्वेद, व्रतवैकल्ये, ज्योतिष, संगीत, यंत्रे, शिक्के-मुद्रा, मजकूर-आकार, तुलसी रामायण, ऐतिहासिक दस्तावेज अशा अंदाजे ३ हजार २०० च्या आसपास ग्रंथातील बहूविध विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शोधप्रबंध सादर केले आहेत.सुंदरकांड ग्रंथ अभ्याकांना उपयोगी पडणारा-नकाणेकररामायण ग्रंथ संस्कृत भाषेतील आहे़ नानासाहेब देव यांनी मराठी भाषेचा आधार घेऊन बाळकांड, अयोध्याकांड हे ग्रंथ प्रकाशन केले़  सध्या सुंदरकांड या गं्रथाचे लिखान सुरू आहे़ या ग्रंथाला जागतिक स्थरावरील दर्जा  मिळण्याचा मानस संस्थेचा आहे़ भाविष्यात अभ्यासकांना या ग्रंथांचा फायदा होणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे