धुळे तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींवर सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST2021-01-19T04:37:18+5:302021-01-19T04:37:18+5:30
सकाळी निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल आणि घोषणांच्या गजरात ...

धुळे तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींवर सत्ता
सकाळी निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल आणि घोषणांच्या गजरात विजयी जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायत निकालांमुळे भाजपचे सभापती बापू खलाणे, पं. स. सभापती प्रा. विजय पाटील, जि. प. सदस्य राम भदाणे, शंकर खलाणे, भाजपचे ज्येष्ठ नेते गजानन पाटील यांना काँग्रेसने चांगलाच झटका दिला.
धुळे तालुक्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजपा असा सामना पाहायला मिळाला. त्यामुळे भाजपच्या पॅनेलला धोबीपछाड मारत आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एकतर्फी विजय मिळविला. त्यामुळे पुन्हा धुळे तालुक्यात भाजपची धुळधाण उडाली आहे. एकूण ७२ पैकी ६५ ग्रामपंचायतींवर आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळविला आहे. त्यात शिरुड, कापडणे, नेर, सोनगीर, विंचूर, नांद्रे, निकुंभे, तरवाडे, भिरडाई-भिरडाणे, आंबोडे, बोरसुले, चिंचखेडे, पिंपरखेड, दह्याणे, मोरदडतांडा, दोंदवाड, गरताड, बांबुर्ले, गोंदूर, मोहाडी प्र. डा., कापडणे, खंडलाय खु., अंचाळे, सरवड, मोराणे प्र. नेर, खंडलाय बु., धामणगाव, कुंडाणे वे., जुनवणे, देऊर खु., बाबरे, बेंद्रेपाडा, नरव्हाळ, वडजाई, मोघण, मोरशेवडी, सायने, पाडळदे, सडगाव, वेल्हाणे, लळींग, शिरधाणे प्र.नेर, कुंडाणेतांडा, निमखेडी, वणी बु., सावळदे, सोनेवाडी, लोहगड, बिलाडी, लोणखेडी, पुरमेपाडा, बल्हाणे, मोरदड, चौगाव, अजंग या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आमदड, दापुरा, बोरविहीर, सांजोरी, चिंचवार, रामी या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बिनविरोध सत्ता मिळवली होती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीनही पक्षांच्या आघाडीने बोरीस, उडाणे, नवलाणे, अजनाळे, सावळी या ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.
माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आ. कुणाल पाटील यांनी शहर कार्यालयात विजयी उमेदवारांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, माजी पं. स. सभापती बाजीराव पाटील, गुणवंत देवरे, कृऊबाचे उपसभापती रितेश पाटील, पं.स.चे गटनेते पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, बापू खैरनार, गणेश गर्दे, हर्षल साळुंके हेे उपस्थित होते.