निजामपूर येथे विजेचा लपंडाव. अखेर त्रस्त ग्रामस्थांनी घेतली साक्रीत अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:37+5:302021-09-08T04:43:37+5:30

निजामपूर : अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने त्रस्त झालेल्या निजामपूरच्या नागरिकांनी अखेर साक्री येथे विभागीय वीज कार्यालयात धाव ...

Power outage at Nizampur. Finally, the distressed villagers met the Sakrit officials | निजामपूर येथे विजेचा लपंडाव. अखेर त्रस्त ग्रामस्थांनी घेतली साक्रीत अधिकाऱ्यांची भेट

निजामपूर येथे विजेचा लपंडाव. अखेर त्रस्त ग्रामस्थांनी घेतली साक्रीत अधिकाऱ्यांची भेट

निजामपूर : अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने त्रस्त झालेल्या निजामपूरच्या नागरिकांनी अखेर साक्री येथे विभागीय वीज कार्यालयात धाव घेऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन गावाच्या वतीने समस्या मांडली.

वीज पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी लक्ष देण्याचे निवेदन दिले आहे.

निजामपूर व जैताणे या दोन्हीपैकी एका गावात दुरुस्ती किंवा तत्सम कामासंबंधी पुरवठा बंद करताना दोन्ही गावातील वीज बंद होती. दोन्ही गावांचे स्वीच वेगळे केले तरच ही समस्या सुटू शकेल. पण तसे होत नाही आणि दिवसभरात विजेचा लपंडाव सुरूच असतो. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे साक्री येथे जैताणे वीज उपकेंद्राचे अभियंता रोहित पाटील व पब्लिक रिलेशन ऑफिसर किरण नांद्रे यांची भेट घेऊन वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची कैफियत मांडली. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा, या आशयाचे निवेदन दिले.

धुळे जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष युसूफ सय्यद, आवेज सैय्यद, सादिक शेख, लियाकत तांबोळी,

शाहरुख मिर्झा, साद सैय्यद निवेदन देताना उपस्थित होते.

070921\1631015687-picsay.jpg

विजेचे निवेदन देतांना निजामपूर ग्रामस्थ

Web Title: Power outage at Nizampur. Finally, the distressed villagers met the Sakrit officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.