वीज कंपनीच्या अभियंत्याची खुर्ची जप्त
By Admin | Updated: March 10, 2017 00:08 IST2017-03-10T00:08:16+5:302017-03-10T00:08:16+5:30
नवापूर पालिकेच्या कर्मचाºयांकडून कंपनीच्या अभियंत्याची खुर्ची जप्त करीत कार्यालय सील करण्यात आले़ मार्चअखेर असल्याने पालिका प्रशासनाकडून वसुलीला वेग आला आहे़

वीज कंपनीच्या अभियंत्याची खुर्ची जप्त
नवापूर : वीज वितरण कंपनीकडे गेल्या १२ वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टी थकीत असल्याने नवापूर पालिकेच्या कर्मचाºयांकडून कंपनीच्या अभियंत्याची खुर्ची जप्त करीत कार्यालय सील करण्यात आले़ मार्चअखेर असल्याने पालिका प्रशासनाकडून वसुलीला वेग आला आहे़ वीज वितरण कंपनीकडे गेल्या बारा वर्षांपासून १६ लाख २० हजार रुपये थकीत आहे़ त्यांना शेवटची नोटीस ३१ जानेवारीला बजावण्यात आल्यावरही कंपनीकडून दखल घेण्यात आली नसल्याने गुरुवारी जप्तीची कारवाई करण्यात आली़