शिरूड ग्रामपंचायतीत झाले सत्ता परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST2021-01-19T04:37:20+5:302021-01-19T04:37:20+5:30
गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपने १७ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले होते. त्यामुळे यावेळच्या होणाऱ्या निवडणुकीत भाजप सत्ता राखणार ...

शिरूड ग्रामपंचायतीत झाले सत्ता परिवर्तन
गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपने १७ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले होते. त्यामुळे यावेळच्या होणाऱ्या निवडणुकीत भाजप सत्ता राखणार की सत्ता परिवर्तन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. येथे ७३.८० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकालाकडे परिसराचे लक्ष लागून होते.
सोमवारी दुपारी शिरूड ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. यात जवाहर विकास पॅनलने १७ पैकी १३ जागा जिंकून सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. तर भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत गुलाबराव धोंडू कोतेकर, कलाबाई भास्कर पवार, योगेश दशरथ गायकवाड, नथाबाई रामलाल चौधरी, सरलाबाई राजेंद्र शेजवळ, भैय्या धुडकू खैरनार, योगेश रावण काळे, रूख्माबाई चिमाजी चव्हाण, पीरन दामू भील, अरुणाबाई बापू पारधी, सुरेश भिवसन कोढे, मनीषा अभिमन सोननीस, वंदना हिंमत गायकवाड, विजय गजानन पाटील, सदोबाई वासुदेव पाटील, मीनाक्षी पाटील हे विजयी झाले आहेत.
विजयानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी रॅली काढली. विजयी उमेदवारांचे गावात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.