सकारात्मक विचार, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर वृद्ध व्यापाऱ्याची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST2021-05-08T04:38:22+5:302021-05-08T04:38:22+5:30

अग्रवाल यांचे बी बियाण्यांचे दुकान असल्याने, अनेक शेतकऱ्यांशी संबंध येतो. या वयातही त्यांनी बरीच काळजी घेतली. परंतु एक ...

Positive Thinking, Strong Will | सकारात्मक विचार, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर वृद्ध व्यापाऱ्याची कोरोनावर मात

सकारात्मक विचार, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर वृद्ध व्यापाऱ्याची कोरोनावर मात

अग्रवाल यांचे बी बियाण्यांचे दुकान असल्याने, अनेक शेतकऱ्यांशी संबंध येतो. या वयातही त्यांनी बरीच काळजी घेतली. परंतु एक दिवस थोडा अशक्तपणा व ताप जाणवला. दोडाईचातील एका दवाखान्यात दोन दिवस औषधोपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली.

एचआरसिटी स्कोअर १ होता, मधुमेह १७०च्या आसपास होता, तरीही ते घाबरले. पण नातेवाईक,मित्र,परिवार यांनी आधार दिल्याने व त्यांच्यातील सकारात्मक विचार होते. त्यांना नंतर पुणे येथील कोरोना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या रात्री त्यांचा एचआरसिटी स्कोअर ८-१२ व ऑक्सिजन पातळी ८० व मधुमेह ३५०च्या आसपास होता. डॅाक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ इलाज सुरू केले. फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . श्वसनास त्रास होत असल्याने बाहेरून प्राणवायू पुरवावा लागला. अग्रवाल यांचे वय, कोरोनाचे प्रमाण बघता त्यांना १० रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागले. डाॅक्टरांनी अथक प्रयत्न केले. सकारात्मक विचार, सकस आहारामुळे कोरोनावर मात केली.

Web Title: Positive Thinking, Strong Will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.