खेड्यात पपई विक्री करून पैसे कमविण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:35 IST2020-04-04T13:34:36+5:302020-04-04T13:35:12+5:30
सोनगीर : मुस्लिम समाजबांधवाच्या बैठकीत एकमताने घेतलेला निर्णय

dhule
न्याहळोद : शेतकऱ्यांनी वर्षभर खर्च व मेहनतीने पिकविलेली फळे ग्राहकांअभावी फेकून देत आहेत. शहरात कुठे पोलिसांचा मार खावा लागतो तर दिवस भर ग्राहक संचारबंदीत येत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी आपले फळ फेकून देत आहेत तर कुठे फुकट वाटत आहे. अशा परिस्थितीत रोकडे कुटुंबियांनी पपई घरातच पिकवून खेड्यात विक्रीकरीत काही पैसे कमाविण्याची धडपड सुरु ठेवली आहे.
शेतकऱ्यांवर संकट येणे हे नवीन नाही. अवकाळी पाऊस, रोगराई, दुष्काळ, बाजारात मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत येतो. काही शेतकरी निराश होऊन टोकाचे पाऊल घेतात. शेतमाल फेकणे किंवा पीक उपडून टाकणे हा पर्याय निवडतात. येथे पपई उत्पादक रोकडे परिवार यांनी शासनाचे संचारबंदीचे नियम पाळत परिसरातील खेड्यात विक्री सुरू केली आहे. यात गर्दी होणार नाही. संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाते. वजन भाव यात वेळ न घालवता लवकर व्यवहार केला जातो. यामुळे शेतकºयाचा खर्च देखील निघत असून गरीबांना स्वस्त पपई मिळत आहे.
दरम्यान दहा दिवसांच्या बंद काळात शेतकºयांना खते व कीटकनाशके न मिळाल्याने पिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील धान्य घरात आले पण कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने एकीकडे धान्य माती मोल ठरत असतांना शहरात माल संपल्याने धान्याचे भाव तीन पटीने वाढले आहेत. शेतमाल अत्यावश्यक सेवेत घेऊन विक्रीची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.