वसमार-धमणार रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 13:02 IST2020-07-23T13:01:42+5:302020-07-23T13:02:03+5:30
म्हसदी : रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक हैराण

वसमार-धमणार रस्त्याची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार ते धमणार रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना रस्त्याने जावे लागत आहे. चालकांना रस्त्यातील खड्डे चुकविताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे.
वसमार येथे बसस्टॉपजवळ असलेल्या मोरीची दुरावस्था झालेली आहे. रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ककानी, भडगाव, शेवाळी, म्हसदी, वसमार येथील ग्रामस्थांना याच रस्त्याने तालुक्याच्या ठिकाणी साक्री येथे ये-जा करावी लागते. सदर रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीसारखे आजार उद्भवू लागले आहे. वसममर ते धमणारपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था आहे, साईडपट्ट्याही उखडल्या आहेत. साक्री सार्वजनिक बांधकाम उपविभाग रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी मंगेश नेरे, जिल्हा परिषद सदस्य इंदूबाई गायकवाड, पं.स. सदस्य राजधर देसले, पं.स. सदस्य बाळु टाटीया, बापू गायकवाड, पिंटू नेरे, मुन्ना पाटील, सागर नेरे, पंकज नेरे, दिनेश बेडसे, किशोर भामरे, संदीप सोनवणे, मचिंद्र सोनवणे, मुन्ना देवरे, रत्नदीप खैरनार, क्रांती ठाकरे, नानासाहेब सोनवणे, भाऊसाहेब करंडे, दाततीर्चे सरपंच रविंद्र माळी, उपसरपंच बापू जाधव यांनी केली आहे.