शिरपूरची पूजा राजपूत विद्यापीठात तिसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:18 IST2021-09-02T05:18:01+5:302021-09-02T05:18:01+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जूनमध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले असून, त्यात पदव्युत्तर द्वितीय वर्ष संगणकशास्त्र विभागातील पूजा ...

शिरपूरची पूजा राजपूत विद्यापीठात तिसरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जूनमध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले असून, त्यात पदव्युत्तर द्वितीय वर्ष संगणकशास्त्र विभागातील पूजा रवींद्र राजपूत हिने ९़८८ ग्रेड म्हणजेच ९१़.६७ टक्के मिळवून विद्यापीठात तृतीय व महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. जयश्री कालिदास बागुल ९१़२१, तर प्रियांका दौलत भामरे हिने ८८़९६ टक्के गुण मिळविले़ पद्व्युत्तर वर्गातील संगणक विभागाचा निकाल १०० टक्के लागला़
संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. एम़ पाटील, डॉ. आर. डी. जाधव, विभागप्रमुख प्रा. बी. एस. पंचभाई यांनी कौतुक केले. या यशासाठी संगणकशास्त्र विभागातील प्रा. बी. एस. पंचभाई, प्रा. एस. डी. मोने, प्रा. ए. जे. माहेश्वरी, प्रा. दीपक चव्हाण, प्रा. मेघा सोनवणे, प्रा. पूजा हजारे, प्रा. गीतांजली पाटील, गणेश सोनार, संजय मोरे, बन्सीलाल चौधरी, दशरथ पटेल, मेहुल गुजराथी, संदेश राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.