नेर येथे चार ठिकाणी होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:07+5:302021-01-15T04:30:07+5:30
गेल्या महिन्याभरापासून गावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते, तर माघारीनंतर प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला होता. सत्ताधारीसह विरोधकांनी ही निवडणूक ...

नेर येथे चार ठिकाणी होणार मतदान
गेल्या महिन्याभरापासून गावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते, तर माघारीनंतर प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला होता. सत्ताधारीसह विरोधकांनी ही निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची केली, तर त्यात अपक्ष उमेदवारांनी उडी घेतल्याने निवडणुकीला चांगलाच रंग चढला. प्रचारानंतर आज प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
निवडणूक कर्मचारी दाखल......
मतदानासाठी गावात चार केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रावर नियुक्त केलेले साठ कर्मचारी दुपारी ईव्हीएम मशीन आणि मतदानासाठी लागणाऱ्या साहित्यासह पोहोचले. तसेच त्यांच्याबरोबर पोलीसही दाखल झाले आहेत. शंभर मीटरच्या आत कोणासही गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पुलिंग एजंटांची होणार भाऊगर्दी......
ग्रामपंचायतीचा एक सदस्य आधीच बिनविरोध झाल्याने १६ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक रिंगणात ६ वॉर्डांत -- उमेदवार उभे आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा एक पुलिंग एजंट राहणार आहे. त्यामुळे या पुलिंग एजंटांची मतदान केंद्रांवर भाऊगर्दी होणार आहे.
मकर संक्रांतीचा साधला योग...
गुरुवारी मकर संक्रांतीचा सण असला तरी प्रचार थांबल्यामुळे उमेदवारांना प्रचार करण्यास बंदी आहे. मात्र, अनेक उमेदवारांनी मकर संक्रांतीचा योग साधत आपल्या वॉर्डातील अनेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच गुप्त प्रचारावरही भर दिल्याचे दिसून आले.