धुळे शहरातून पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:19 IST2017-07-23T18:19:35+5:302017-07-23T18:19:35+5:30
गुडय़ा खून प्रकरणानंतर धुळे शहरात तणावपूर्ण शांतता
_ns.jpg)
धुळे शहरातून पोलिसांचे पथसंचलन
ऑ लाईन लोकमतधुळे,दि.23 - गुडय़ा खून प्रकरणानंतर अतिशय वेगात घडामोडी घडत असल्यामुळे शहरातील वातावरण दूषित होत आह़े कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी धुळे पोलीस प्रशासनाने शहरातील संवेदनशिल भागातून रविवारी सकाळी संचलन केल़े गुडय़ा खून प्रकरणामुळे शहरातील वातावरण अतिशय संवेदनशिल झालेले आह़े संशयित आरोपी फरार आहेत. त्यांचे लोकेशन मिळत नसल्याने तपास कामात अडचणी येत आहेत़ आरोपींच्या नावावर अर्थात माहिती देणा:याला बक्षिस जाहीर करण्याची वेळ आली आह़े अशातच विशेष पथकाने पुणे येथून एका संशयितास शिताफीने ताब्यात घेतले आह़े तसेच दोन दिवसात महामंडळाच्या चार बसेसचे नुकसान झाल्यामुळे शहरातील वातावरण अधिकच गंभीर झालेले आह़े ही सर्व परिस्थिती लक्षात घेता शहरातील संवेदनशिल भागात पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव व विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांनी संचलन केल़े