धुळे : राष्ट्रीय महामार्ग तीनवर चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे २ लाखांचा गांजा वाहून नेणाऱ्या वाहनांसह तिघांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल केला़ ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली़पोलीस कर्मचारी पी़ व्ही़ पाटील यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, २८ मे रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास शिरपूरकडून मुंबईकडे जाणाºया वाहनाला अडविण्यात आले़ वाहनाची तपासणी केली असता त्यात हिरवट, पिवळसर, अर्धवट सुकलेला गांजा आढळून आला आहे़ स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने तिघांनी हा साठा जवळ बाळगल्याचे दिसून आले़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात राधेश्याम लखन विश्वकर्मा (३०), गणेश दीपक जगताप (३१) (दोघी रा़ बागले इस्टेट सर्कलजवळ, ठाणे पश्चिम) आणि जहागिर मोहीद्दीन शेख (५१) यांच्या विरोधात संशयावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दोन लाखांचा गांजा पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:15 IST