पोलिसांनी चोरट्यांकडून सहा दुचाकी केल्या हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 17:30 IST2023-05-22T17:29:48+5:302023-05-22T17:30:06+5:30
याप्रकरणी शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सुरू होता.

पोलिसांनी चोरट्यांकडून सहा दुचाकी केल्या हस्तगत
शिरपूर (धुळे) : पोलिसांनी दोन चोरट्यांकडून सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या दुचाकींची किंमत २ लाख ८० हजार एवढी आहे. डीबी पथकाने ही कारवाई केली आहे.
येथील हेमंत अनिल भोई (रा. आदर्शनगर, शिरपूर) यांनी शहरातील खंडेराव मंदिरासमोर दुचाकी गाडी लावली असताना अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती. याप्रकरणी शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सुरू होता. पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक तपास करीत असताना संतोष विठ्ठल हटकर (३३, रा. क्रांतीनगर शिरपूर) व रितेश सुरेशसिंग जमादार (३७, रा. सातपूर, नाशिक, हल्ली क्रांतीनगर, शिरपूर) हे दोघे संशयितरीत्या फिरताना मिळून आले होते. त्यांची पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी खंडेराव मंदिराजवळून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ६ दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्यात. ५० हजार रुपये किमतीच्या २ दुचाकी गाड्या, ४० हजारांची २ तर २५ हजारांची २ अशा एकूण ६ गाड्या पोलिसांनी जप्त करून २ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. चोरट्यांकडून शिरपूर येथील १ तर शिंदखेडा येथील १ असे २ गुन्हे चोरीचे उघडकीस आले.