खाजगी वाहन पकडून पोलिसांनी 9 बाल मजुरांची केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 14:39 IST2021-01-31T14:37:26+5:302021-01-31T14:39:25+5:30

बोराडी : अवैधरित्या खाजगी वाहतूक करणारे वाहन पकडून त्यात शेतीच्या कामासाठी जाणारे ९ बाल मजुरांची शिरपूर वाहतूक पोलीसांनी सुटका ...

Police rescue 9 child laborers by seizing a private vehicle | खाजगी वाहन पकडून पोलिसांनी 9 बाल मजुरांची केली सुटका

खाजगी वाहन पकडून पोलिसांनी 9 बाल मजुरांची केली सुटका

बोराडी : अवैधरित्या खाजगी वाहतूक करणारे वाहन पकडून त्यात शेतीच्या कामासाठी जाणारे ९ बाल मजुरांची शिरपूर वाहतूक पोलीसांनी सुटका केली व त्यांना सुखरुप आपल्या घरी पोहोचविले. तसेच अवैध वाहतूक करणारऱ्या वाहन चालकाविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
वाघाडी येथे बाळदे फाट्यावर क्षमतेपेक्षा जास्त मजुर वाहतूक करणाऱ्या वाहनावर शहर पोलीस वाहतूक शाखेतफर्फे कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अवैध प्रवासी वाहतूक करणारे मजुरांचे वाहन पोलीसांनी अडविले. वाहनावर आत तसेच टबवर तसेच वाहनांच्या बाहेर लटकून प्रवास करीत होते.पोलिसांनी वाहन थांबवून सर्वांना उतरवून वाहन ताब्यात घेतले. सदर वाहनात १९ पेक्षा जास्त मजूर वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. यात १० ते १५ वयोगटातील नऊ बाल मजूर आढळून आले. या सर्व बाल मजुरांची सुटका करुन त्यांना त्यांच्या घरी सोडविण्यात आले. सदर वाहनावर मोटार अधिनियम ६६/१९२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
तोरणमाळ घाटाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल नारायण पाटील,पोकॉ ठाकरे,पोकॉ रवींद्र पावरा यांनी केली.
यावेळी बघणाऱ्यांची गर्दी जमा झाली होती.

Web Title: Police rescue 9 child laborers by seizing a private vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.