पोलीस कर्मचारी निलंबित, पोलीस अधीक्षकांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:59+5:302021-09-05T04:40:59+5:30
जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेला तो पोलीस कर्मचारी पोलीस प्रशासनाला डोईजड झाला होता़ वरिष्ठांचे आदेश न मानणे, कामचुकारपणा ...

पोलीस कर्मचारी निलंबित, पोलीस अधीक्षकांची कारवाई
जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेला तो पोलीस कर्मचारी पोलीस प्रशासनाला डोईजड झाला होता़ वरिष्ठांचे आदेश न मानणे, कामचुकारपणा करणे यासह काही बाबी वरिष्ठांच्या नजरेसमोर आल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे़ वारंवार सांगूनही कामात सुधारणा होत नसल्यामुळे त्या कर्मचाऱ्याची रवानगी मुख्यालयात करण्यात आली असेल अशी शक्यता आहे़ वारंवार सांगून देखील त्याच्यात सुधारणा दिसून आलेली नसावी़ परिणामी त्याचे निलंबन करण्याशिवाय गत्यंतर उरले नसल्याची बाब समोर आली आहे़
दरम्यान, यासंदर्भात पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे़, पण ही आमची अंतर्गत बाब असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली़