शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे : गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 10:31 IST

धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. 

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.  आपल्या पिस्तुलातून स्वतःवर  गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली आहे. बुधवारी रात्री उशिरा 1.30 वाजण्याच्या  सुमारास  त्यांनी आत्महत्या केली आहे. ज्यावेळी त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं त्यावेळी त्यांच्या पत्नीदेखील घरातच होत्या. या घटनेने जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी राहणारे पोलीस निरीक्षक सपकाळे त्यांच्या घरी धावून गेले. घटनेबाबतची माहिती त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे व अन्य अधिकारी घटना स्थळी पोहोचले. परदेशी यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. परदेशी यांनी कुख्यात गुंड गुड्डया हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली होती. परदेशी हे  मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या सेवानिवृतीला चार महिने उरलेले असताना त्यांच्या आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप समजलेले नाही. 

बुधवारी संध्याकाळी नाशिक येथील काम आटपून परदेशी धुळ्यामध्ये परतले होते. त्यांनी रात्री आपल्या सहका-यांना  संपर्क साधत पांझरा नदी काठावरील निर्माण झालेले वाद मिटवण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी थोड्याच वेळेत तेथे येतो, असेही त्यांनी सांगितले. पण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, नाशिक येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव नाशिकला घेऊन जाण्यासाठी परदेशी यांचा मुलगा व अन्य नातेवाईक धुळ्यात पोहोचले आहेत.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस